|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बालेकिल्ल्यात आज ‘रयतेच्या राजा’चा गौरव

बालेकिल्ल्यात आज ‘रयतेच्या राजा’चा गौरव 

प्रतिनिधी /सातारा :

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्त राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सातारा जिह्याच्या वतीने सोमवार दि. 13 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे जाहीर नागरी सत्कार होत आहे. यावेळी सर्व पक्षातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पालकमंत्री विजयबापू शिवतारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक भाजप व काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांची फळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटताना दिसत आहे. तसेच जिल्हा प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.

सोमवारी दुपारी चार वाजता खासदार शरद पवार साहेब शासकीय विश्रामगृहात येणार असून तेथून थेट सभास्थानी जिल्हा परिषदेच्या मैदानावर ते जाणार आहेत. तेथे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन पवारसाहेब करणार आहेत. त्यानंतर सभास्थानी स्थानापन्न होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून राष्ट्रवादीचे सर्व नेते गेले आठवडाभर झटताना दिसत आहेत. पोलीस दलानेही या कार्यक्रमासाठी कडक बंदोबस्त ठेवला असून जिह्यातील विविध ठिकाणांहून अनेक कार्यकर्ते व वाहनांचे ताफे मोठय़ा प्रमाणावर येणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत व पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे.