|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » पंकज अडवाणीचे 17 वे विश्व विजेतेपद

पंकज अडवाणीचे 17 वे विश्व विजेतेपद 

वृत्तसंस्था /डोहा :

भारताचा अव्वल बिलीयर्डस्पटू पंकज अडवाणीने आपल्या वैयक्तिक कारकीर्दीतील 17 वे विश्व विजेतेपद पटकाविले. येथे झालेल्या आयबीएसएफ विश्व बिलीयर्डस् स्पर्धेत अडवाणीने ब्रिटनच्या माईक रसेलचा 6-2 अशा प्रेम्समध्ये पराभव केला.

पंकज अडवाणीने गेल्यावर्षी बेंगळूरमध्ये 150-अप फॉर्मेंट बिलीयर्डस् स्पर्धा जिंकली होती. पंकजने डोहातील या स्पर्धेत रसेलचा 0-155, 150-128, 92-151, 151-0, 151-6, 151-0, 150-58, 150-21 असा पराभव केला. या स्पर्धेत अडवाणीने उपांत्य फेरीत भारताच्या रूपेश शहाचा 5-2 प्रेम्स्मध्ये तर रसेलने सिंगापूरच्या पीटर गिलखिस्टचा 5-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. सोमवारपासून याच ठिकाणी आयबीएसएफ विश्व बिलीयर्डस् चॅम्पियनशीप लाँग अप फॉर्मेंटची खेळविली जाणार असून अडवाणी या स्पर्धेत विजेतेपद मिळवून दुहेरी मुकूट पटकाविण्याचा प्रयत्न करेल.

Related posts: