|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » क्रिडा » दक्षिण कोरियाचा चुंग अजिंक्य

दक्षिण कोरियाचा चुंग अजिंक्य 

वृत्तसंस्था /मिलान :

दक्षिण कोरियाचा टेनिसपटू चुंग हेयॉनने शनिवारी येथे पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नेक्स्ट जेन चॅम्पियन एटीपी पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना रशियाच्या रूबलेव्हचा पराभव केला.

21 वर्षीय चुंगने अंतिम सामन्यात रूबलेव्हचा 3-4 (3-5), 4-3 (2-1), 4-2, 4-2 असा पराभव केला. पाच दिवस चाललेल्या राऊंड रॉबिन पद्धतीच्या या स्पर्धेत चुंगने एकही सामना गमविला नाही. त्याने या जेतेपदाबरोबरच 390000 डॉलर्सचे बक्षीस मिळविले आहे. एटीपी स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद मिळविणारा चुंग हा दक्षिण कोरियाचा पहिला टेनिसपटू आहे.

Related posts: