|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » अंधेरी स्टेशनवर महिलेच्या डोक्यात स्लॅब कोसळला

अंधेरी स्टेशनवर महिलेच्या डोक्यात स्लॅब कोसळला 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मुंबईच्या अंधेरी स्टेशन परिसरात तिकीट काढण्यासाठी उभ्या असणाऱया 56 वर्षीय महिलेवर अचानक स्लॅब कोसळला. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 20 टाके पडले आहे.

आशा मोरे असे जखमी महिलेचे नाव आहे.स्लॅब कोसळल्याने त्या बेशुद्ध झाल्या.त्यांना तात्काळ रेल्वेच्या ऍम्ब्युनलन्समधून कुपर रूग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून अशा मोरे यांना अवघ्या 500 रूपयांची मदत देण्यात आली. डोक्याच्या दुखापतीवर 500 रूपयांमध्ये उपचार कसे होणार, असा प्रश्न आशा मोरे यांच्या नातेवाईकाने विचारला आहे.