|Monday, November 13, 2017
You are here: Home » Top News » उज्ज्वल निकम लढवणार अनिकेत कोथळेचा खटला

उज्ज्वल निकम लढवणार अनिकेत कोथळेचा खटला 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेप्रकरणाचा खटला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिला जाणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी सांगली येथे कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले, कोथळे कुटुंबीयांना सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. याशिवाय साक्षीदार आणि कोथळे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

Related posts: