|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » एक खुनी पंतप्रधान आणि एक पक्षाध्यक्ष : कोळसे-पाटील

एक खुनी पंतप्रधान आणि एक पक्षाध्यक्ष : कोळसे-पाटील 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन हजार मुस्लिमांची कत्तल करुन आले आहेत. मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत. एक खुनी सभागृहात पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे, अशा शब्दांत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

अहमदनगर येथील विराट सामाजिक ऐक्य परिषदेत कोळसे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “मोदींची लोकप्रियता कृत्रिम आहे. खरी लोकप्रियता नेहरु, इंदिरा गांधींची होती, गांधीजींची होती. मोदींची लोकप्रियता मॅनेज केलेली आहे. एक खुनी सभागृहात पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे. दरम्यान, कोळसे पाटील यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts: