|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रखर प्रकाश झोताद्वारे मच्छीमारीवर निर्बंध

प्रखर प्रकाश झोताद्वारे मच्छीमारीवर निर्बंध 

केंद्र सरकारचा अध्यादेश

कारवाई करण्याचे तटरक्षक दलाला आदेश

वार्ताहर /रत्नागिरी

प्रखर प्रकाश झोताद्वारे समुद्रात मच्छीमारी करणाऱयास केद्रशासनाद्वारे पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व मत्स्यव्यवसाय विभागाकडून संबंधित खात्यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे. तसेच प्रकाश प्रकाशाझोताद्वारे मच्छीमारी करतांना मच्छीमार नौका आढळल्यास या मच्छीमार नौकांवर कारवाई करण्याचे आदेश तटरक्षक दलाला देण्यात आले आहेत.

शासनाकडून हा अध्यादेश 10 नोक्हेंबर 2017 रोजी काढला आहे. या आदेशांची त्वरित कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे खोल समुद्रात प्रखर प्रकाशझोताद्वारे अवैध मच्छीमारी करणाऱयाना चाप बसणार आहे. येथील समुद्रात मोठय़ा प्रमाणावर अवैध मच्छीमारी सुरू असून याबाबत स्थानिक पारंपारिक मच्छीमारांकडून नियमित तक्रार सहाय्यक मत्स्य व्यवसाय खात्यांकडे करण्यात येत होत्या.

दरम्यान 14 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पारंपारिक मच्छीमार तसेच पर्ससीन मच्छीमार, जिल्हाधिकारी, तसेच सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी व इतर संबधित खात्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर शासनाकडून आलेला हा अध्यादेश महत्वाचा ठरणार आहे.

मात्र आता केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय कृषी व कल्याण विभागाकडून प्रखर प्रकाशझोताद्वारे मच्छीमार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याने तसेच अशा प्रकारे मच्छीमारी करणाऱयावर तटरक्षक दलाने कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने अवैध मच्छीमारीला आळा बसणार आहे.

Related posts: