|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » अमेरिका फेडरेशन चषकाचा मानकरी

अमेरिका फेडरेशन चषकाचा मानकरी 

वृत्तसंस्था/ मिनसेक

रविवारी येथे अमेरिका महिला टेनिस संघाने 18 व्यांदा फेडरेशन चषक सांघिक टेनिस स्पर्धा जिंकताना बेलारूसचा 3-2 असा पराभव केला. या अंतिम लढतीतील झालेल्या शेवटच्या निर्णायक दुहेरी सामन्यात अमेरिकेच्या शेलबाय रॉजर्स आणि कोको व्हँडेवेग या जोडीने बेलारूस सॅबेलिनेका आणि सेसनोव्हिच यांचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव केला.

अमेरिकेने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 18 व्यांदा फेडरेशन चषकावर आपले नाव कोरले आहे. या अंतिम लढतीत रविवारी एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या व्हँडेवेगने बेलारूसच्या सॅबेलिनेकाचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव करून आपल्या संघाला 2-1 असे आघाडीवर नेले होते. त्यानंतर सेसनोव्हिचने एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या स्टिफेन्सवर 4-6, 6-1, 8-6 अशी मात करत बेलारूसला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर महिला दुहेरीचा अंतिम सामना निर्णायक ठरला. अमेरिकेने हा सामना जिंकून बेलारूसचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यावेळी सुमारे 8 हजार शौकिन उपस्थित होते. या स्पर्धेतील पहिल्यादिवशी अमेरिका आणि बेलारूस यांनी आपले पहिले एकेरीचे सामने जिंकून बरोबरी केली होती.

Related posts: