|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक

‘डॉ.आंबेडकरांचे स्नेही : दत्तोबा पोवार’ ग्रंथ संशोधनाच्या अंगाने मौलिक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   दत्तोबा पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शाहू महाराज यांची भेट घालुन देण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. या विषयाचा संदर्भ सुधीर पोवार यांनी तारखेसह ‘डॉ. आंबेडकर स्नेही : दत्तोबा पोवार’ या ग्रंथात नमुद केला आहे. तेव्हा हा गंथ संशोधनाच्या अंगाने मोलिक भुमिका बजावनारा आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक रमेश शिंदे यांनी केले.

  सुधीर पोवार लिखीत ‘डॉ. आंबेडकर स्नेही : दत्तोबा पोवार’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये रविवारी हा कार्यक्रम पार पडला. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक विजय सुरवाडे यांच्या हस्ते या ग्रथांचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे होते.

    शिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात आजही सर्व धर्म समभावतेने नांदतात यात डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा मोठा हात आहे. महिलांना त्यांचा हक्क बहाल करताना नोकरदार महिलांना डॉ. आंबेडकरांनी 3 महिने प्रसुतिची आणि तीही पगारी रजा देण्याचे काम केले. काँग्रेसने राजकारणामध्ये जरी त्यांच्याविरोधात पी. बाळू, देवरूखकर, पाना राजभोळ या तीन चर्मकारांना उभे केले असले तरी त्यांनी सर्वांसाठी समान राज्यघटना निर्माण केली. यामध्ये त्यांचे अथक परिश्रम आणि कष्ट होते. अध्यक्षस्थानी प्रा. विनय कांबळे यांनी आणि विजय सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिवंगत सुधीर पोवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी केले. रंगराव पांडे यांनी आभार मानले. यावेळी दिवंगत सुधीर पोवार यांचा मुलगा अमोल पोवार, संजय पोवार, डॉ. प्रा. संभाजी बिरांजे, रंगराव पांडे, सुरेश प्रबुद्धे तसेच भारतीय बौद्ध समाज, डॉ. बाबासाहेब ऍन्ड बुद्धीस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, बिनीमय पब्लिकेशन आणि अमोल सुधीर पोवार परिवारचे सदस्य उपस्थित होते.