|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीचा आत्महत्त्येचा प्रयत्न

छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीचा आत्महत्त्येचा प्रयत्न 

प्रतिनिधी/ कराड

छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱया शाळकरी मुलीने विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला असून याप्रकरणी छेडछाड करणाऱया संशयितास अटक करण्यात आली आहे. सलीम वजीर मुलाणी (वय 25 रा. दौलत कॉलनी, शनिवार पेठ, कराड) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार पेठ परिसरातील एक 14 वर्षीय शाळकरी मुलगी इयत्ता नववीत शिकते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत निघाली होती. त्यावेळी संशयित सलीम मुलाणी हा तिचा पाठलाग करत गेला. त्याने मुलगीस अडवून तिचा हात धरला. माझे तुझ्यावर प्रेम असून तुला माझ्यासमवेत यावे लागेल, अशी धमकी दिली. घाबरलेली मुलगी त्याच्या तावडीतून सुटका करून घेत शाळेत गेली. शाळेतून घरी आल्यावर ती दोन दिवस भीतीच्या छायेखाली वावरत होती. रविवारी सायंकाळी तिने घरातच विषारी औषध घेतले. औषध पिल्यानंतर तिला काही वेळातच उलटय़ा व्हायला लागल्या. कुटुंबियांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मुलीस तातडीने उपचारासाठी रूग्णालयात नेले. उपचार होऊन तिची प्रकृती स्थिर झाल्यावर तिच्याकडे चौकशी केली. सलीम मुलाणी याने छेडछाड केल्यानेच हा प्रकार केल्याचे तिने कुटुंबियांना सांगितले. यानंतर रविवारी रात्री मुलीच्या वडिलांनी हा प्रकार कराड पोलिसांना सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी या प्रकरणी चौकशी करत संशयितास पकडले. मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Related posts: