|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बोर्डा येथे ‘आयटीआय’ कायम ठेवण्याचा विचार

बोर्डा येथे ‘आयटीआय’ कायम ठेवण्याचा विचार 

प्रतिनिधी/ मडगाव

बोर्डा-मडगाव येथे सद्या कार्यरत असलेली मडगाव आयटीआय त्याच ठिकाणी कायम ठेवण्याचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना दिली. काल बोर्डा येथील आयटीआयची पाहणी केल्यानंतर आर्लेम बगल रस्त्याच्या बाजूच्या नव्या जागेची देखील पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

सद्या कार्यरत असलेल्या आयटीआयच्या ठिकाणी किंचित बदल केले तर नव्याने आयटीआय ची इमारत उभारण्याची गरज नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. बोर्डा येथील मल्टिपर्पज संकूलात सरकारी महाविद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय व आयटीआय अशा तीन शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मैदान देखील आहे. त्यामुळे नव्याने आयटीआय इमारत बांधण्याची जरूरी नसल्याचे मत व्यक्त केले.

काल दुपारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी आर्लेम बगल रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी आयटीआय साठी नवीन इमारत बांधणे शक्य आहे का ? याची पाहणी केली. मात्र, या जागेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यमान आयटीआयचीच जागा योग्य असल्याचे संकेत दिले.

नव्याने जागा पाहिलेल्या ठिकाणी आयटीआय इमारत बांधली तरी क्रीडा मैदान उभारणे शक्य होणार नसल्याचे आढळून आले, त्यात ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्याने व या खात्याला जागा आवश्यक असल्याने आयटीआय इमारत बांधून फार काही शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी थोडी खाजगी जागा असून या जागेतून जाण्यासाठी सुद्धा वाट मिळणे कठीण असल्याचे यावेळी अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Related posts: