|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मार्केट परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ

मार्केट परिसरात चोरटय़ांचा धुमाकूळ 

प्रतिनिधी/ बेळगांव

भुरटय़ा चोरांनी मार्केट परिसरात धुमाकूळ घातल्याने बाजारपेठेत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार पेठ, कांदा मार्केट, झेंडा चौक याठिकाणी सहा दुकानांची शटर उचकटून चोरटय़ांनी रोख रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला आहे. मात्र याबाबत व्यापारी वर्गाने पोलिसांत तक्रार देणे टाळले आहे.

मार्केटसह रविवार पेठ भागातील या दुकानांची शटर्स तोडून गल्ल्यांमधील चिल्लर रक्कम लांबविण्यात आली आहे. एस. व्ही. पाटणकर स्टोअर्स, बी. एन. डोंबळे यांचे धान्य दुकान, भातकांडे फटाके दुकान, उप्पीन जनरल स्टोअर्स आदी दुकानांची शटर्स तोडून ऐवज लांबविण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related posts: