|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणीत उसाचा ट्रक्टर उलटला

अथणीत उसाचा ट्रक्टर उलटला 

सुदैवाने वर्दळ कमी असल्याने जीवितहानी टळली : घटनेत वाहनाचे नुकसान

वार्ताहर / अथणी

 निराणी शुगरला ऊस भरून जाणाऱया ट्रक्टरचा एक्सल तुटून ट्रक्टर उलटल्याची घटना अथणीतील खासगी दवाखान्यासमोर सोमवारी घडली. यामध्ये ट्रक्टर वाहनासह उसाचे नुकसान झाले आहे. मात्र येथे वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. येथील आंबेडकर सर्कल ते बसस्थानकापर्यंतच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक असते. तसेच नागरिकांची वर्दळ मोठी असते. सोमवारी उसाने भरलेला ट्रक्टर निराणी साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान ट्रक्टर दुपारी 1 च्या सुमारास येथील खासगी दवाखान्यासमोर आला असता एक्सल तुटल्याने ट्रक्टर उलटला. ट्रक्टरमध्ये भरलेला ऊस पूर्णतः विखुरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

 दरम्यान अपघातावेळी या मार्गावरील वर्दळ कमी होती. रस्ता खुला असल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. यानंतर मात्र काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरातून होणारी अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांसह प्रवाशांतून होत आहे.

Related posts: