|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस कोगनोळी टोलनाक्यावर, नेते बेळगावात

पोलीस कोगनोळी टोलनाक्यावर, नेते बेळगावात 

वार्ताहर / कोगनोळी

बेळगाव येथे 13 रोजी झालेल्या महामेळाव्यासाठी जाणाऱया महाराष्ट्रातील नेतेमंडळींना रोखण्यासाठी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱया टोलनाक्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रविवार 12 रोजी मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातून येणाऱया नेतेमंडळींवर नजर ठेवण्यात आली होती. यावेळी बेळगाव येथे होणाऱया महामेळाव्यास येण्यास महाराष्ट्रातील नेतेमंडळींवर कर्नाटक शासनातर्फे बंदी घालण्यात आली आहे. त्यांना बेळगाव येथे जाण्यास मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते. मात्र महाराष्ट्रातील नेतेमंडळी कोगनोळी येथे असणाऱया टोलनाक्याकडे आलेच नाहीत. तर ते बेळगाव येथे अन्यमार्गाने येत महामेळाव्या सहभागी झाले. कोगनोळी टोलनाक्यावर निपाणीचे सीपीआय किशोर भरणी, पीएसआय निंगनगौडा पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र अन्य मार्गाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी दाखल झाले.

Related posts: