|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म. ए. समिती आमदारांचा सभात्याग

म. ए. समिती आमदारांचा सभात्याग 

मराठीतून बोलण्यास भाजप, निजद आमदारांचा आक्षेप

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील व खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांनी सोमवारी सभात्याग केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भगवा फेटा बांधून हे दोन्ही आमदार सभागृहात दाखल झाले होते. मराठीतून बोलण्यास आक्षेप घेतल्याने त्यांनी सभात्याग केला.

गेल्या अधिवेशनापासून आजपर्यंत निधन झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात येत असताना आमदार अरविंद पाटील यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात केली. सुरुवातीलाच निजद आमदार वाय. एस. व्ही. दत्ता, एच. एम. कोनरेड्डी यांच्यासह काँग्रेस व भाजपमधील आमदारांनीही आक्षेप घेतला.

 

मराठीतून काय बोलता? असे विचारात त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार अरविंद पाटील व आमदार संभाजी पाटील यांनी सभात्याग केला. याचवेळी दोन मिनिटे मौन पाळून निधन झालेल्या 14 मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभाध्यक्ष के. बी. कोळीवाड यांनी विधानसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी 10.30 पर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले.

Related posts: