|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महाराष्ट्रातील नेत्यांवरही गुन्हे नोंद

महाराष्ट्रातील नेत्यांवरही गुन्हे नोंद 

प्रतिनिधी / बेळगाव

प्रशासनाने घातलेला बंदी आदेश झुगारून महामेळावा भरविल्यानंतर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळींसह आयोजकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. येथील टिळकवाडी पोलीस स्थानकात गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. सरकारने परवानगी दिलेली नसताना व्यासपीठाची उभारणी करून तसेच ध्वनिक्षेपकाची अनुमती नसताना त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱयांचा बंदी आदेश असताना महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी या महामेळाव्यात सहभाग घेतला आहे. अशा कारणास्तव त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील, खासदार धनंजयराव महाडिक, आमदार संध्यादेवी कुप्पेकर, माजी आमदार के. पी. पाटील, बेळगावचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील, बिदरचे रामभाऊ राठोड यांच्यासह दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, नगरसेवक अनंत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related posts: