|Thursday, October 18, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » 10 महिन्यात मराठवाडय़ात 800 शेतकऱयांच्या आत्महत्या

10 महिन्यात मराठवाडय़ात 800 शेतकऱयांच्या आत्महत्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांसाठी केवळ घोषणा करणाऱया या सरकारच्या सत्तेत गेल्या 10 महिन्यात मराठवडय़ात 800शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. म्हणजे महिन्याला 80 आत्महत्या मराठवडय़ात होत असल्याचे वास्तव समोर आले.

सततच्या दुष्काळमुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यात सरकारने कर्जमाफीची घोषणा केली खरी मात्र अजूनही शेतकरी कर्जमाफी कधी होणार याची वाट पाहत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 800 आत्महत्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या बीड जिह्यात झाल्या आहेत. 167 शेतकऱयांनी तिथे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या जागण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Related posts: