दाऊदच्या तिन्ही संपत्तींचा 11 कोटीत लिलाव

ऑनलाइन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा आज लिलाव झाला. या तिन्ही मालमत्तांचा लिलावा 11.50कोटीत झाला असून सैफी बुऱहाणी अपलिफ्टमेंटने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.
दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्ता सैफी बुऱहाणी अपलिफ्टमेंटने विकत घेतल्या आहे. दरम्यान हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना या लिलावात अपयश आल्याने दाऊदच्या हॉटेलवर शौचालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न भंगल आहे.सकाळी 10 ते 12 दरम्यान मुंबईच्या चर्चगेटमधील आयएमसी बिल्डिंगमध्ये किलाचंद कॉन्फरन्स रूममध्ये हा लिलाव करण्यात आला.यावेळी स्वामी चक्रपाणी यांनी बोली लावली पण त्यांना दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यात अपयश आले.
Related posts:
Posted in: leadingnews
Tags: daud assets