|Thursday, October 18, 2018
You are here: Home » leadingnews » आता हॉटेलिंगसाठी ५ टक्के जीएसटी

आता हॉटेलिंगसाठी ५ टक्के जीएसटी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

हॉटेलिंगसाठी असणारा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) १८ टक्क्यांहून ५ टक्के केला आहे. मात्र, हॉटेलचालकांनी या दरात काही बदल केल्यास संबंधित हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली.

केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर हॉटेलिंगसाठी १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वारंवार टीका केली जात होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीच्या दरात कपात करण्यात आली. मात्र, हॉटेलिंगच्या दरात कोणताही बदल केला गेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर आज बापट यांनी हॉटेलिंगसाठी जीएसटीचा दर १८ टक्क्यांहून ५ टक्के केला आहे. तसेच हे नवे दर न आकारणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Related posts: