|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » युवा पिढीने विधी साक्षर बनावे!

युवा पिढीने विधी साक्षर बनावे! 

मालवण न्यायाधीश रोहिणी काळे यांचे प्रतिपादन

तालुका विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षर मार्गदर्शन कार्यक्रम

वार्ताहर / मालवण:

आजच्या काळात अत्याचार, गुन्हे, सायबर क्राईम यात वाढ होत असून युवक युवकांनी दैनंदिन जीवनात योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. यासाठी आपले मूलभूत हक्क, अधिकार विविध कायद्यांची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. युवा पिढीने साक्षरतेबरोबरच विधी साक्षर बनणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवण न्यायालयाच्या न्यायाधीश रोहिणी काळे यांनी केले.

मालवण तालुका विधी सेवा समितीच्यावतीने मालवण येथील भंडारी. . सो. कनि÷ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विधी साक्षर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश रोहिणी काळे यांच्यासह सहाय्यक सरकारी वकील नदाफ, ऍड. गिरीश गिरकर, ऍड. प्राची कुलकर्णी, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, प्राचार्या सौ. समिता मुणगेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्या सौ. मुणगेकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी काळे म्हणाल्या, सोशल मीडिया ही आजची गरज असली तरी तरुण पिढीने त्याचा वापर नियंत्रित ठेवला पाहिजे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर झाल्यावर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. व्हॉटसऍप, फेसबुक सारख्या सोशल मीडियाद्वारे इतरांशी मैत्री करताना मर्यादा पाळाव्यात. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नये. आपली खासगी माहिती त्यावर जास्त शेअर करू नये. त्याचा दुसऱयांकडून दुरुपयोग झाल्यास त्यातून सायबर क्राईम जन्माला येते त्याचा मोठय़ा प्रमाणात त्रास मुलींना सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या माहितीचा, फोटोंचा दुसऱयांनी दुरुपयोग करू नय.s यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे. आपल्याबाबत घडण्याऱया अनुचित घटना, अत्याचार याबाबत मुलामुलींनी तात्काळ आपल्या पालकांना विश्वासात घेऊन सांगाव्यात तसेच पालकांनीही मुलांशी सतत संवाद ठेवावा. कायदे हे आपल्या संरक्षणासाठी न्यायासाठी आहेत त्यामुळे विद्यार्थीविद्यार्थिनीनी आपले मूलभूत हक्क, अधिकार तसेच विविध कायद्यांचे ज्ञान मिळविणे गरजेचे आहे, असेही काळे यांनी सांगितले. यावेळी ऍड. गिरकर यांनी बाल हक्क, ऍड. नदाफ यांनी रॅगिंग, ऍड. .प्राची कुलकर्णी यांनी सायबर क्राईम याबाबत कायद्यांची माहिती देत विस्तृत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती सातार्डेकर यांनी तर आभार प्रा. पवन बांदेकर यांनी मानले.

Related posts: