|Tuesday, November 14, 2017
You are here: Home » Top News » राजस्थान पोलिसात पहिल्यांदाच भरती होणार तृतीय पंथी

राजस्थान पोलिसात पहिल्यांदाच भरती होणार तृतीय पंथी 

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थान उच्च न्यायालयाने जालोर जिल्ह्यातील तृतीय पंथीय गंगा कुमारीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राजस्थान पोलिसांना गंगा कुमारीला सरकारी नोकरीत सामावून घेतले जावे, असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे राजस्थान पोलिसात आता पहिल्यांदाच तृतीय पंथी सेवेत येणार आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थान पोलीस विभाग पोलीस कॉन्स्टेबल या पदावर पहिल्यांदाच तृतीय पंथीयाची नियुक्ती करणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांनी सुनावणीदरम्यान गंगा कुमारीला सहा आठवड्यांच्या आत कामावर रुजू करून घ्या. तसेच तिला 2015 पासून राष्ट्रीय लाभ देण्याचाही निर्णय दिला आहे. याबाबत याचिककर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले, गंगा कुमारी पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र असतानाही जालोर पोलीस अधीक्षकांनी तिला नियुक्त केले नाही. कॉन्स्टेबल भरती परीक्षेत पास होऊनही नियुक्तीवरून गृह विभागाचे अधिकारी संभ्रमात होते.

दरम्यान, एखाद्या तृतीय पंथीयाला सरकारी नोकरी देणारा राजस्थानातील हा पहिला प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.

Related posts: