|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लेप्टोच्या पार्श्वभूमीवर 24 तास नियंत्रण कक्ष

लेप्टोच्या पार्श्वभूमीवर 24 तास नियंत्रण कक्ष 

जि..अध्यक्षा रेश्मा सावंत यांची माहिती

पाऊस लांबल्याने लेप्टोचा उद्रेक

प्रतिबंधासाठी साडेतीन लाख डॉक्झिसायक्लीन गोळय़ा उपलब्ध

सात वर्षात लेप्टोचे 156 रुग्ण, 39 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेली तीन वर्षे लेप्टोवर नियंत्रण मिळवता आले होते. परंतु यावर्षी पाऊस लांबल्याने लेप्टोची साथ उद्भवली आहे, असे असले तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी साडेतीन लाख डॉक्झिसायक्लीनच्या गोळय़ा उपलब्ध केल्या असून लेप्टोबाधित 28 गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला आठवडय़ातून दोनवेळा याप्रमाणे सहा आठवडे गोळय़ा दिल्या जाणार आहेत. 24 तास आरोग्य कक्ष सुरू करण्यात आला असून लेप्टोच्या पार्श्वभूमीवर दोन फिजिशियन डॉक्टरही उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जि. . अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लेप्टोच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. साळे यांनी माहिती देताना सांगितले की, सिंधुदुर्गात लेप्टो नावाची लागण किरकोळ प्रमाणात पूर्वीपासून होती. परंतु 2010 मध्ये लेप्टोची मोठी साथ उद्भवली. त्यावर्षी लेप्टोचे 87 रुग्ण सापडले आणि 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या सात वर्षात लेप्टोचे 156 रुग्ण सापडले तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. 2014 2015 दोन वर्षात लेप्टोचा एक रुग्ण सापडला नव्हता. 2016 मध्ये लेप्टोचा एक रुग्ण सापडला एकाचा मृत्यू झाला. यावर्षात जानेवारी 2017 पासून आतापर्यंत 39 रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

गेली तीन वर्षे लेप्टोवर नियंत्रण ठेवण्यात यश आले होते. परंतु यावर्षी उशिरापर्यंत पाऊस लागला. दिवाळी संपली तरी पाऊस सुरू राहिला भात कापणीही सुरू होती. मध्येच ऊन पडून पुन्हा पाऊस लागल्याने उंदीर बाहेर पडले त्यांच्या मलमुत्रापासूनच भात कापणीच्यावेळी लेप्टोची साथ पसरली आहे. आणखी आठ ते दहा दिवस लेप्टोचा प्रादूर्भाव राहू शकतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. भात कापणीच्यावेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी? याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

साडेतीन लाख डॉक्झिसायक्लीनच्या गोळय़ाही उपलब्ध केल्या असून लेप्टोबाधित 28 गावात घरोघरी गोळय़ा वाटप करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक कुटुंबाला आठवडय़ातून दोनवेळा याप्रमाणे सहा आठवडे गोळय़ा दिल्या जाणार आहेत. या गोळय़ा घेतात की नाही याची आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांच्यामार्फत खात्री केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गोवा कोल्हापूर येथे संदर्भ कक्ष सुरू केला असून 108 नंबरची रुग्णवाहिका उपलब्ध ठेवली आहे. खासगी डॉक्टरांची कार्यशाळाही घेण्यात आली आहे. जनतेने साधा ताप आला तरी तात्काळ सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन केले.

28 गावे लेप्टोने बाधित

यावर्षी नव्याने 24 लेप्टोने गावे बाधित झाली असून मागील तीन वर्षातील चार लेप्टोबाधित गावे अशी 28 गावे लेप्टोबाधित आहेत. त्यामध्ये आकेरी, माणगाव, साळगाव, मोरे, कालेली, हुमरस, झाराप, आंबडपाल, हिर्लोक, अणाव, आरवली, होडावडे, कोनाळ, तिलारी, हेवाळे, शिरंगे, कसई, सासोली, असनिये, शेर्ले, इन्सुली, निगुडे, आंबोली, चौकुळ, कुणकेली, मळगाव, नेमळे, ओटवणे इत्यादी.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हाच रामबाण उपाय

सिंधुदुर्गात लेप्टो, माकडताप, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाईनफ्लू असे सर्वच मिश्र आजार उद्भवू लागले आहेत. त्यावर उपचार तर करायलाच हवेत. परंतु हे आजार वारंवार उद्भवत असल्याने नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच रामबाण उपाय आहे. त्यासाठी नियमित चांगली आहार व्यायाम करणे आवश्यक असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले.

Related posts: