|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » रसगुल्ला बंगालचाच

रसगुल्ला बंगालचाच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचे सिद्ध झाल्याने जीआय मानांकन मिळाले आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यात गेल्या दोन वर्षांपासून रसगुल्ल्यावरून वाद सुरु असताना या दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

याबाबतची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘सर्वांसाठी गोड बातमी आहे. रसगुल्लासाठी बंगालला जीआय मानांकन मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आणि अभिमानी आहोत’, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

Related posts: