|Thursday, October 18, 2018
You are here: Home » उद्योग » फ्लिपकार्टची स्मार्टफोन क्षेत्रात उडी

फ्लिपकार्टची स्मार्टफोन क्षेत्रात उडी 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी फ्लिपकार्टने स्मार्टफोन क्षेत्रात उडी घेतली आहे. कंपनीकडून बिलियन या नावाने ब्रॅन्ड सुरू करण्यात आला असून हा भारतीय बनावटीचा आहे. बिलियन कॅप्चर प्लस या स्मार्टफोन दोन क्रारात दाखल करण्यात आला असून 32 जीबी मॉडेलची किंमत 10,999 रुपये आणि 64 जीबीसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील.

आगामी कालावधीत बिलियन ब्रॅन्डखाली अनेक उत्पादने दाखल करण्यात येतील असे सचिन बन्सल यांनी म्हटले. फ्लिपकार्टने अगोदरच मिक्सर ग्रिन्डर, कुकवेअर, बॅकपॅक, इस्त्री यासारखी उत्पादने गेल्या काही महिन्यात दाखल केली आहेत. कॅप्चर प्लसमध्ये 13 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 3500 एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती 15 मिनिटांत 7 तास चालू शकते. क्वॉलकॉम स्नॅपडॅगन 625 ऑक्टा कोअर प्रोसेसर, 3 वा 4 जीबी रॅम, 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले, मेटालिक बॉडी, फिंगरप्रिन्ट सेन्सर, ऍन्ड्रॉईड नॉगट असून ओरिओमध्ये अपग्रेड करता येईल. डेझर्ट गोल्ड आणि मिस्टिक ब्लॅक रंगात असणाऱया या स्मार्टफोनची बुधवारपासून विक्री करण्यात येईल.

Related posts: