|Tuesday, November 14, 2017
You are here: Home » उद्योग » नफा कमाईने बाजारात पुन्हा घसरण

नफा कमाईने बाजारात पुन्हा घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 92, एनएसईचा निफ्टी 38 अंशाने कमजोर

वृत्तसंस्था/ मुंबई

बाजारात मंगळवारीही नफा कमाई झाल्याने दबाव आला होता. कमजोरीने निफ्टीने 10,200 च्या खाली पोहोचला, तर सेन्सेक्स 33,000 च्या खाली घसरला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,175 आणि सेन्सेक्स 32,900 पर्यंत घसरला होता. दिवसअखेरीस दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरत बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स 92 अंशाने घसरत 32,942 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 38 अंशाच्या कमजोरीने 10,187 स्तरावर स्थिरावला.

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागातही विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरला.

आयटी, धातू, पीएसयू बँक, औषध, एफएमसीजी, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागातही विक्री झाली. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी घसरत 25,285 वर बंद झाला. निफ्टीचा आयटी निर्देशांक 0.6 टक्के, धातू निर्देशांक 0.5 टक्के, पीएसयू बँक निर्देशांक 0.7 टक्के, औषध निर्देशांक 0.3 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरले.

बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.4 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.9 टक्के, ऊर्जा निर्देशांक 0.6 टक्क्यांनी कमजोर झाला. वाहन, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात मात्र खरेदी झाली.

दिग्गज समभागांची कामगिरी

हीरो मोटो, भेल, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, रिलायन्स इन्डस्ट्रीज, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 2.1-1.3 टक्क्यांनी वधारले. भारती इन्फ्रा, आयओसी, एल ऍण्ड टी, एचपीसीएल, पॉवरग्रिड, एशियन पेन्ट्स, टीसीएस, ओएनजीसी, सन फार्मा 4.5-1.2 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात टाटा ग्लोबल बेव्हरेजीस, टोरेन्ट फार्मा, अजंता फार्मा, डिवीज लॅब्स, जिलेट इंडिया 5.2-1.9 टक्क्यांनी वधारले. एसजेव्हीएन, मॅरिको, पेट्रोनेट, जीई टी ऍण्ड टी, बायोकॉन 3.6-2.7 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात टिनप्लेट, ऍक्शन कन्स्ट्रक्शन, मर्क इलेक्ट्रॉनिक, गुजरात अल्केलीज, वॅस्कॉन इंजीनिअरिंग 20-12.4 टक्क्यांनी मजबूत झाले. शालीमार पेन्ट्स, स्वेलेक्ट एनर्जी, पीटीसी इंडिया फायनान्शियल, एनसीसी, रुचि सोया 9.8-7.25 टक्क्यांनी घसरले.

Related posts: