|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

लक्ष्मीच्या कोपाला आमंत्रण देऊ नका

बुध. दि. 15 ते 21 नोव्हेंबर 2017

पैसा कितीही मिळाला तरी तो टिकत नाही, काय करावे ते कळत नाही असे अनेकजण म्हणत असतात. आपण पैसे कसे हाताळतो यावरून या बाबी समजू शकतात. ज्या पैशावर आपले जीवन चालते त्या पैशाशी कधीही मस्ती करू नये. नोटांवर वाटेल ते लिहिण्याची काही लोकांना सवय असते, अशा लोकांच्या हाती पैसे अजिबात टिकत नाहीत. बँकातील कर्मचाऱयांकडून नोटांची खाडाखोड फार होते असे दिसून येते.शक्मयतो पैशाशी खेळणे टाळावे. अशा मार्गातील पैसा कसा व कधी जाईल ते कळत नसते. यासाठी पैशाशी कधीही खेळ करू नये. नको त्या वस्तू घरात ठेवल्यानेही हाती पैसा टिकत नाही. कोणतेही शास्त्र वापरले तरी कष्टाशिवाय काहीही मिळणार नाही. लक्ष्मी का कोपते याची अनेक कारणे असतात. हुंडय़ासाठी किती बळी पडत असतात. हे आपण रोज पहात असतोच. हुंडय़ाच्या मागणीवरून ज्यावेळी गृहिणीच्या अथवा तिच्या मातापित्याच्या डोळय़ांतून दुखाश्रू  बाहेर पडतात, तेव्हाच लक्ष्मीचा कोप सुरू होतो व त्याचे परिणाम पुढे दिसून येतात. आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी नोकरी उद्योगासाठी आम्ही इतका पैसा खर्च केलेला आहे, असे सांगून हुंडा मागण्याचा प्रयत्न होतो पण मुलगा तुमचा आहे त्याच्या कल्याणासाठीच खर्च केलात दुसऱयासाठी तर नाही ना, नशिब चांगले असेल मुलीचा अथवा सुनेचा, माता पित्यांचा चांगला मान ठेवलात तर लक्ष्मी का प्रसन्न होणार नाही? जसा मुलासाठी खर्च केलात तसाच त्या मुलीच्या माता पित्यांनीही तिच्यासाठी खर्च केलेलाच असतो पण त्या गोष्टींकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. ज्या मुलीला घरची लक्ष्मी म्हणून घरी आणली जाते, तिचा मान किती लोक ठेवतात? तसेच जशी आपली आई तसेच पतीचीही आई आहे त्यामुळे सासूचा मान आपण ठेवलाच पाहिजे अशी भावना मुली का ठेवत नाहीत? पतीची कमाई किती आहे, आपण खर्च किती केला पाहिजे याचे भान अनेक तरुणींना नसते. लग्न झाल्यावर पती हा सर्वस्व असतो. बायकोने नवऱयाकडे मागायचे नाही तर कुणाकडे हात पसरायचे याचा विचारही होणे आवश्यक आहे. यातूनच वाईटपणा आल्यास लक्ष्मी निश्चित कोपते, ज्यावेळी घरच्या स्त्रीच्या डोळय़ातून अश्रू येतात तीच लक्ष्मीचा कोपाची सुरुवात असते, कारण स्त्री ही आदिशक्ती मानलेली आहे. यासाठी स्त्री पुरुष लहान थोर कुणीही असो त्यानी आपल्या हातून कधीही अपमान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जन्मपत्रिकेत धनसहम, भाग्यसहम बिंदू बिघडल्यास लक्ष्मीचा कोप हमखास होतो व त्यामागे वरील व्यावहारिक कारणे असतात. गणितावरून हे समजू शकते. काही लोकांना दुसऱयाच्या घरी जावून आपली द:gखे सांगून रडण्याची सवय असते. अशानेही त्या घरातील शांती ढळते, तसेच शिवीगाळ व व्यसनांचा प्रादुर्भाव तसेच एखाद्याविषयी निष्कारण खोटेनाटे सांगून त्याच्याविषयी मन कलुषित करणे याच्यामुळेही दारिद्र येते. श्रीमंतीला उतरती कळा लागते. मुलांची लग्ने होत नाहीत व झालीच तर ती टिकण्याची खात्री नसते. यासाठीच घरातील वातावरण शक्मयतो स्वच्छ व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कावळा, चिमण्या, कुत्री, मांजरी, कबुतर, वानरे,मैना, गायी वगैरेंना आपल्या हातून चांगले काहीतरी खावू घाला, त्याचे चांगले परिणाम दिसून येतात व लक्ष्मीची प्रसन्नता लाभते.

 

मेष

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल विचार न करता उसने पैसे दिल्यास अचानक नुकसान दर्शविते. कोणतेही काम विचारपूर्वक करावे.आर्थिक भरभराटीच्या दृष्टीने अनुकूल असल्याने किरकोळ गुंतवणूक वगैरेस उत्तम ठरेल. राशीस्वामी मंगळ बलहीन आहे. कोणतेही धाडसी काम जपून करा. उधार, उसनवारी व कर्जापासून दूर रहा.


वृषभ

ग्रहांचा विचित्र योग, मित्र मंडळीसाठी खर्च करावयास लावील. ताणतणाव तसेच मनाविरुद्ध घटना घडू शकतात. नोकरी व्यवसायात सावधगिरी बाळगावी. सप्तमातील रवीमुळे कौटुंबिक जीवनात काही तरी गोंधळ माजविण्याची शक्मयता. हर्षल रवीचे भ्रमण अचानक फायदा पण दर्शविते. पण तरीही काळजीपूर्वक व्यवहार करावेत.


मिथुन

शुक्र, मंगळ, रवि, हर्षल योग. नोकरी व्यवसाय व उपजीविकेवर परिणाम  करणारा आहे. घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेवू नका. नोकरी व्यवसायात अचानक बदल, नको त्या ठिकाणी स्थलांतर वगैरेची शक्मयता. कोणतेही काम विचारपूर्वक करावे. प्रेमप्रकरणापासून दूर रहावे. काही प्रकरणे अंगलट येऊ शकतात. मध्यस्थीपासून दूर रहा.


कर्क

अमावास्या योग तसेच मंगळ, रवी, हर्षल योग अचानक आर्थिक हानी, तीर्थक्षेत्री नुकसान अथवा महत्त्वाच्या वस्तुची अदलाबदल दर्शविते. त्यासाठी सावध रहावे. कुटुंबातील बऱयाच अडचणी कमी होतील. महत्त्वाच्या घटनांची सुरुवात होईल. नवे संकल्प असतील तर ते पंधरवडय़ात पूर्ण होऊ लागतील.


सिंह

अमावास्या काही बाबतीत शुभ आहे. शुक्र, मंगळ, रवी, हर्षल योग शारीरिक व आर्थिक बाबतीत चांगला नाही. वाहन वगैरे जपून चालवा. कोणत्याही व्याधी असतील तर त्याकडे दुर्लक्ष नको. काही चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. शिक्षणात यश, धनलाभ, नवे स्नेहसंबंध जुळणे, विवाह वाटाघाटीत यश यांचा त्यात समावेश राहील.


कन्या

धनस्थानी शुक्र चांगला असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील.मंगळ, रवी, हर्षल योग चांगला नाही. कोणत्याही गैरसमजाला वाव देवू नका. कितीही साधे काम असेल अथवा ओळखीचे लोक असतील तरी ते वैवाहिक जोडीदारापासून लपवून ठेवू नका. खासगी जीवनात खळबळ माजविणारे ग्रहमान आहे. कुणाही अनोळखी व्यक्तीला आपले फोटो, बँक खाते नंबर देऊ नका.महिलांनी फेसबुक हाताळताना सावध राहणे योग्य ठरेल.


तुळ

शुक्र उत्तम असल्याने आनंदी रहाल. पण मंगळ, रवी, हर्षल योग तुमच्या राशीला शुभ नाही. कोणतेही काम जपून करावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी. कुणाच्याही भानगडीत पडू नये. काही जुने व्यवहार पूर्ण होऊ लागतील. टाकावू वस्तुंना चांगली किंमत येवू लागेल. गुप्तशत्रुंच्या कारवाया उघड होतील.


वृश्चिक

12 व्या स्थानी शुक्र, गुरू योग दैवी कृपेची अनुभूती देईल. प्रेमप्रकरणे होण्याची दाट शक्मयता, पण फसवणूक देखील होऊ शकते. काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायात काही बदल होतील. मुलाबाळांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा. मोबाईल वगैरे देताना दहावेळा विचार करा. त्यांच्या चुका तुम्हाला निस्तराव्या लागतील.


धनु

विचित्र ग्रहयोगाच्या प्रभावामुळे वास्तू व व्यवहारात काही विचित्र प्रकरणे निर्माण होतील. स्वभावात हटवादीपणा व रागीटपणा दिसून येईल. त्यातून विपरीत काही होणार नाही याची काळजी घ्या. कौंटुंबिक जीवन व कमाई याबाबत बाहेरच्या व्यक्तींना काही सांगू नका. पण या काळात वास्तुत नवे बदल अथवा दुरुस्ती केल्यास काही दोष कमी होतील.


मकर

अमावास्या कल्याण योगावर असल्याने तुम्हाला काही अंशी शुभ आहे पण शेजारी व नातेवाईक यांच्यामुळे नको त्या प्रकरणात  अडकावे लागेल. जागा,स्थावर इस्टेट, वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण होण्याची शक्मयता आहे. सामंजस्य तसेच प्रसंगवधानाने त्यातून मार्ग काढावा लागेल. लिखाणाला प्रसिद्धी मिळण्याचे योगही दिसतात.


कुंभ

कल्याणकारी अमावास्या भाग्यस्थानी होत आहे. ध्यानीमनी नसता मोठमोठे प्रवास योग व आर्थिक प्राप्तीचे मार्ग दिसतील. वैवाहिक जीवनात काही विचित्र प्रकार अनुभवास येवू शकतात. भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले बदल घडवील. डोळय़ांचे विकार उदभवतील. टोकदार वस्तुपासून जपावे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.


मीन

सप्तमस्थान बलवान आहे. वैवाहिक सौख्य चांगले राहील. आरोग्य व मानसिक स्थितीवर परिणाम करणारा अमावास्या योग आहे. कोणतेही निर्णय जपून घ्यावेत. अनेक महत्त्वाच्या शुभ कामांचा शुभारंभ कराल. शत्रू निष्प्रभ होतील. आर्थिक स्थितीही सुधारेल. आतापर्यंत तुम्हाला त्रास देणारे लोक तुमची प्रशंसा करू लागतील.


 

Related posts: