|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजऱयाच्या विकासाला दिली चराटींनी दिशा

आजऱयाच्या विकासाला दिली चराटींनी दिशा 

प्रतिनिधी/ आजरा

अशक्य गोष्ट शक्य करण्याची धमक अशोक चराटी यांच्याकडे आहे. आजरा तालुक्याच्या विकासाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे, असे गौरोवोद्गार आमदार प्रकाश आबिटकर यांनी काढले. चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

सकारात्मक भूमिका असणारा कार्यकर्ता, अशी चराटी यांची प्रतिमा असल्याचे माने म्हणाले. चराटी सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, असे डॉ. घाळी यां नी सांगितले.   अशोक चराटी म्हणाले की, शाहू साखर कारखान्याप्रमाणे आजरा कारखाना चालवायचा आहे. भाजपाच्या सरकारने आजरा कारखाना, सूतगिरणीला मदत देण्याबरोबरच आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देऊन विकासाला चालना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

 प्रास्ताविक  आजरा अर्बन बँकेचे चेअरमन विलास नाईक यांनी केला. चराटी यांचा सत्कार आमदार आबिटकर व माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर बिनविरोध निवड झालेले डॉ. सतीश घाळी, भैय्या माने, प्रा. किरण पोतदार, व्यासपीठावरील मान्यवरांसह नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, आजरा सूतगिरणीच्या अध्यक्ष श्रीमती अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरूण देसाई, माजी सभापती मसणू सुतार, आजरा बँकेचे संचालक विजयकुमार पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, संचालक दिगंबर देसाई, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, मारूती घोरपडे, जि. प. सदस्या सौ. सुनिता रेडेकर, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. उदयनी साळुंखे, गडहिंग्लज मार्केट कमिटीच्या सभापती सौ. सरीता चौगुले, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्डय़ान्नावर, आजरा सूतगिरणीचे संचालक राजाराम पोतनीस, निवृत्ती शेंडे आदी उपस्थित होते. भैय्या टोपले यांनी आभार मानले.

Related posts: