|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शासनाकडून शेतकरी व सामान्यांचा भ्रमनिरासः पी.आर.पाटील

शासनाकडून शेतकरी व सामान्यांचा भ्रमनिरासः पी.आर.पाटील 

वार्ताहर/ आष्टा

सरकारच्या फसवी धोरणे व फसव्या कर्जमाफीमुळे देशातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. केंद्र व राज्य सरकार हे शेतकऱयांच्या विरोधी असल्याचा आरोप राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी केला. तसेच शेतकऱयांनी न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरवर उतरावे, असे आवाहनही केले.

वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे मोरया गणेश मंडळ, संघर्ष कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, व उमाजीराजे तरुण मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीतील थेट लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पी.आर.पाटील बोलत होते. याप्रसंगी पोखर्णीच्या पहिल्या थेट लोकनियुक्त सरंपच सौ. रेखाताई सतीश पाटील, तांदुळवाडीचे सरपंच रमेश पाटील, बावचीचे सरपंच वैभव रकटे, गोटखिंडीचे सरपंच विजय लौंढे, नागावचे सरपंच तात्यासो पाटील, भडकंबेचे सरपंच सुधीर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोका उद्योग समुहाचे संस्थापक सतीश पाटील, माजी सरपंच मानसिंगराव पाटील, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, सर्वोदयचे माजी संचालक नंदकुमार पाटील, डॉ. पी.एम.पाटील, युवक नेते प्रतिक पाटील, जि.प.सदस्या सौ. राजश्री एटम, विजयबापू पाटील, रणजीत पाटील, सौ. छाया पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी पी.आर.पाटील यांचा सत्कार नागनाथ जाधव व अतुल लौंढे यांच्याहस्ते करण्यात आला. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांचा सत्कार रघुनाथ जाधव व बबन मंडले यांच्याहस्ते, तर जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील यांचा सत्कार तानाजी लौंढे व नितीन मंडले यांच्याहस्ते, तसेच महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील यांचा सत्कार मालन लौंढे व प्रमिला जाधव यांच्याहस्ते, तर युवकचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांचा सत्कार नानासो मंडले व निवास जाधव यांच्याहस्ते तर, जि.प.सदस्या सौ. राजश्री एटम यांचा सत्कार सौ. सविता मंडले व सौ. इंदुबाई अवघडे यांच्याहस्ते करण्यात आला.  यावेळी सुखदेव जाधव, गोरख लोंढे, श्रीकांत यादव, उत्तम बादरे, सौ .स्मिता पाटील, पार्वती पाटील, सौ. सुवर्णा सुतार, सौ. द्रोपदी पडळकर, सौ. संगिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शामराव यशवंत जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

माजी सरपंच मानसिंगराव पाटील, फौजदार काशिनाथ मंडले, डीपीआयचे अशोक वायदंडे, प्रवीण जाधव, सिध्दार्थ ग्रुपचे अध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. नूतन ग्रामपंचायत सदस्य सुखदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव, मंडले, लोंढे परिवार व मोरया, संघर्ष व उमाजीराजे मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना पी.आर.पाटील पुढे म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात देशाची व राज्याची पीछेहाट सुरु आहे. नोटाबंदीमळे सामान्य माणूस कोलमडून पडला आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. तरुणाईची वाताहात झाली आहे. या सरकारचा पाडाव करण्यासाठी सज्ज रहायला हवे.

विजयबापू पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात आमदार जयंतराव पाटील यांच्यामुळेच विविध विकासकामे झाली आहेत. आज वाळवा तालुका राज्यात अग्रेसर राहिला आहे. तो केवळ आमदार जयंतराव पाटील यांच्यामुळेच. तालुक्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी आमदार जयंतराव पाटील यांच्या पाठीशी रहा.

रणजीत पाटील म्हणाले, चांगले काम करणाऱयांच्या पाठीशी नेहमीच सर्वसामान्य लोक रहात असतात. नंदुकुमार पाटील म्हणाले, आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षात कोटय़वधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. पाटील घराणे कधीही आमदार जयंतराव पाटील यांची साथ सोडणार नाही, अशी ग्वाहीही शेवटी त्यांनी दिली.

स्वागत विश्वनाथ जाधव यांनी केले. आभार अतुल लोंढे यांनी मानले.

Related posts: