|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अतिक्रमण हटाव मोहिमेस तीव्रतेने प्रारंभ

अतिक्रमण हटाव मोहिमेस तीव्रतेने प्रारंभ 

प्रतिनिधी/ वाई

वाई नगरपालिकेने जाहीर केल्याप्रमाणे 14 तारखेच्या सकाळी 10 पासून अतिक्रमण हटाव मोहिमेस तीव्रतेने सुरुवात केली. महात्मा फुले मंडईपासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून शहरातील अतिक्रमणे दूर करेपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.

अतिक्रमण हटविताना कट्टयावर बांधलेली अनाधिकृत शेडस् अनाधिकृत बांधलेले कट्टे काढून टाकले. याशिवाय रस्त्यावर लावण्यात येणारे बोर्डस अनाधिकृतपणे रस्त्यावर बसून वाहतुकीला अडथळा करणाऱयांची अतिक्रमणे हटविण्यात आली. विशेषतः बाजारात असणाऱया नगरपालिका, शॉपिंग सेंटरचे सर्व कट्टे अनाधिकृत पत्रा शेडस् संपूर्णपणे हटविण्यात आली. अतिक्रमण मोहिमेचे वेळी काही व्यापाऱयांनी आपण हावून आपली अतिक्रमणे काढून शासनास सहकार्य केले.

अतिक्रमण हटविण्यापूर्वी नगरपरिषदेने तीन ते चार दिवस रिक्षावर अनौंसमेंट करुन अतिक्रमणे आपण होवून काढावीत असे आवाहन केले होते. याशिवाय समक्ष भेटून अधिकाऱयांनी 14 पूर्वी आपली अतिक्रमणे काढावीत म्हणून आवाहन केले होते.

अतिक्रमण हटाव मोहिमेचे वेळी एक जेसीबी, दोन ट्रक्टर्स, नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि 25 कर्मचारी कार्यरत होते. कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून अग्निशामक ही ठेवण्यात आला होता.

विद्युत कनेक्शनमुळे कोणतीही अडचण निर्माण होवू नये म्हणून एमएसईबीचे कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. अतिक्रमण मोहीम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावी म्हणून उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित कट्टे, प्रोव्हिजनल डी.वाय.एस.पी. पारजे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक बबनराव येडगे, शिशीर शिंदे, कदम यांसह 25 पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.

वाई शहरात होणाऱया वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी सर्व अतिक्रमणे काढल्यास वाईतील रस्ते मोकळा श्वास घेतील आ†िण पादचाऱयांना मुक्तपणे चालता येईल. असा विश्वास वाईतील महिला आणि नागरिकांनी व्यक्त केला. तर धनदांडग्यांची अतिक्रमणे प्रथम काढण्यात येतील अशीही अपेक्षा व्यक्त केली.

 

Related posts: