|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » योजना बिघडण्याचे पाप रामराजेंचेच

योजना बिघडण्याचे पाप रामराजेंचेच 

आमदार जयकुमार गोरे यांनी डागली तोफ

प्रतिनिधी/ सातारा

जिहे कठापूर योजना पूर्ण करणारा अशा पोकळ दर्पोक्त्या मारुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री विजय शिवतारे यांनी या योजनेबाबत पोकळ घोषणाचा केल्या आहेत. ही योजना बिघडण्याचे पाप रामराजेंनी केले असून जिह्यातील पाणी योजनेचे नुकसान केले आहे. त्यांना परमेश्वरही माफ करणार नाही, असा टोला लगावत, आमदार जयकुमार गोरे यांनी  डॉ. दिलीपराव येळगावकर यांचाही मेंदू गळका आहे. त्यांच डोकं फिरले आहे, अशीही टप्पणी केली.

साताऱयात विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, जिहे- कटापूर उपसा सिंचन योजनेला 2007-08मध्ये तुटपूंजा निधी मिळाल्यामुळे या योजनेचे काम रखडले गेले. मी आमदार झालो अन माणच्या जनतेसाठी विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर 2009 ते 2013 या काळात तात्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात जिहे – कटापूर या योजनेसाठी सुमारे 85 कोटी रुपये आणले. पालकमंत्री विजय शिवतारे हे आता आले. त्याच्या कार्यकाळात केवळ 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. जिहे कठापूर उपसा योजना ही मूळ 269 कोटींची होती. ती वाढवून ऑक्टोबर 2017 अखेर 393 कोटींची झाली. असे असताना अजून ती योजना पूर्ण झाली नाही. हे पालकमंत्र्यांनी झाकून ठेवले आहे. या योजनेला आघाडीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली नाही, असे ते सांगतात. परंतु पालकमंत्र्यांनी हे सांगावे की त्यांच्या कार्यकाळात दोन वर्षात एक साधा नया पैसाही आणला नाही. जे 20 कोटी आहेत ते पाठीमागेचे आहेत ते त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांना करत पालकमंत्री उद्या म्हणतील मी प्रतापगडचा जन्मदाता आहे. सिंधुदुर्ग मी बांधला, अशा शब्दात टीप्पणी केली.

रामराजेंसह शशिकांत शिंदे, पालकमंत्र्यांवर टीका

पुढे ते म्हणाले, स्वतःला भगीरथ म्हणवणारे व जिह्यातील पाणी योजनांचे वाटोळे करणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे हे एक्सप्रेस कॅनॉलने जिलह्याच्या वाटय़ातील पाणी बारामतीला पळवण्यात पहिला नंबर आहे. हे पाप त्यांनी केले. उगाचच पाण्याच्या प्रश्नावरुन निवडणूका लढवून जिह्यातील जनतेची दिशाभूल करु नका. जिह्यातील 7 टीएमसी पाणी बारामतीला पोहचवण्याचे काम त्यांनी केले. जिह्यातील सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर जिह्यातील पाणी दुसऱया जिह्यात पळवण्याची वेळ आली नसती, असा आरोप त्यांनी करत त्यांनी रामराजे, शशिकांत शिंदे आणि विजय शिवतारे यांच्यावर निशाणा साधला.

डॉ. येळगावकरांच्या मेंदूला लागली गळती

जयकुमार गोरे यांनी डॉ. येळगावकर यांच्यावरही निशाणा साधला, येळगावकर यांनी जो आरोप केला आहे. मुळात माण तालुक्यातील बंधाऱयांना गळती लागण्याऐवजी डॉ. येळगावकर यांच्याच डोक्याला गळती लागली आहे. ते काहीही बरळतात, अशी टीप्पणी केली.

ट्रम्प यांचे नाव द्या

माणवासियांना कोणाचे नाव द्यावे याच्याशी काही देणं घेणं नाही. कोण म्हणतय बाळासाहेबांचे नाव द्या तर कोण म्हणतय लक्ष्मण इनामदार यांचे नाव द्या. उद्या जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेला पैसे दिले तर त्यांचे नाव द्या पण ही योजना पूर्ण करा, अशीही फिरकी घेतली.

Related posts: