|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेला एक कोटी 72 लाख रुपयांचा निधी

पालिकेला एक कोटी 72 लाख रुपयांचा निधी 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत शहरातील विविध भागातील रस्ते डांबरीकरण करणे गटार बांधणे स्ट्टी लाईट पोल उभारणे आदी कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केले होते गेली दोन महीने या संदर्भात महसुल मंत्री ना चंद्रकांत पाटील व पालकमंत्री ना विजयबापु शिवतारे यांचे कडे पाठपुरावा सुरू केला होता या पाठपुराव्याला यश आले आहे पालिकेने सादर केलेल्या सर्व प्रस्तावाना पालकमंत्री ना विजयबापु शिवतारे यांनी मंजुरी दिली असुन या सर्व कामांसाठी पालिकेला 1 कोटी 72 लाख रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहीती नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी दिली 

        महाराष्ट्चे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर प्रसिध्द आहे या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी देशभरातुन आठरा ते वीस लाख पर्यटक भेट देत असतात त्या मुळे सुट्टय़ांच्या काळात व विविध हंगामात येथे मोठया प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते या शिवाय येथे दरवर्षी मोठया प्रमाणावर पाउस पडतो या सर्व कारणामुळे शहर व परीसरातील रस्त्यांची अवस्था बिकट होते रस्त्यांवर वारंवार खड्डेd पडुन रस्ते खराब होतात त्या मुळे शहरातील सर्व रस्त्यांना डांबरीकरण करावे लागते या सर्व कामांसाठी मोठया प्रमाणावर निधीची आवश्यक्त लागते पालिकेची उत्पन्नाची साधने पाहता हा खर्च पालिकेला पेलवत नाही निधीची जुळवा जुळव करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी काही दिवसांपुर्वी महाबळेश्वर येथे महसुल मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील वनमंत्री ना सुधीर मुनगंटीवार नगरविकास राज्य मंत्री ना रणजीत पाटील पालकमंत्री ना विजयबापु शिवतारे हे आले होते या सर्व मंत्री महोदया बरोबर नगराध्यक्षा स्वप्नीलि शिंदे यांनी विविध विकास कामां बाबत चर्चा केली तसेच या विकास कामांसाठी शासना कडुन निधीची आवश्यक्त आहे ही बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणली या चर्चे वेळी त्यांनी निधी देण्यासाठी मान्यता दिली होती परंतु त्या साठी रितसर प्रस्ताव सादर करण्याची आवश्यक्ता होती नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी विविध विकास कामांसाठी विविध प्रस्ताव तयार केले व हे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केले होते प्रस्ताव सादर केल्या नंतर या प्रस्तावा संदर्भात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पालकमंत्री विजयबापु शिवतारे व महसुल मंत्र.ाप् ना चंद्रकात पाटील यांचेकडे योग्य प्रकारे पाठपुराव केला गेली दोन महीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन पालिकेने सादर केलेल्या विविध विकास कामांसाठी 1 कोटी 72 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे 

          निधी मंजुर झालेल्या प्रस्तावा मध्ये जयभवानी पतसंस्था कॉर्नर ते स्कुलमोहल्ला डोंगरे विहिर रस्ता डांबरीकरण करणे , कोळी आळी रस्ता डांबरीकरण करणे तानु पटेल रोड डांबरीकरण करणे गणेश पेट रस्ता डांबरीकरण करणे बिफ मार्केट रस्ता डांबरीकरण करणे कोळी आळी रस्त्यांवर एल ई डी लाईट सह स्ट्टी पोल उभारणे तानु पटेल रोडवर स्ट्टि पोल उभारून एल ई डी लाईट बसविणे तानु पटेल रोड व बिफ मार्केट रोड लगत गटार बांधणे स्कुल मोहल्ला रोडवर कॅनॉल बांधणे आदी विकास कामांचा समावेश आहे 

        काल जिल्हयाचे पालकमंत्री ना विजय बापु शिवतारे व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाबळेश्वर पालिकेने सादर केलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली असुन 1 कोटी 72 लाखांचा निधी पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे महाबळेश्वर शहराची निकड लक्षात घेवुन पालिकमंत्री ना शिवतारे यांनी पालिकेचे प्रस्ताव मंजुर केल्याने नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी पालकमंत्री ना शिवतारे यांचे आभार मानले असुन महाबळेश्वरचा चौफेर विकास करून या पर्यटन स्थळाचा असलेला नावलौकिकात भर घालणार असल्याचे मत नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी व्यकत केले 

या वेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार व विविध समित्यांचे सभापती नगरसेवक उपस्थित होते 

           

Related posts: