|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केएलई सोसायटीचा 102 वा स्थापन दिन साजरा

केएलई सोसायटीचा 102 वा स्थापन दिन साजरा 

प्रतिनिधी/ बेळगाव

केएलई सोसायटीचा 102 वा स्थापन दिन संस्थेच्या शताब्दी सभागृहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कुलगुरु प्रा. डॉ. विवेक सावजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी, आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 च्या संस्था शताब्दी सोहळय़ासाठी पाठविलेल्या संदेशात ही संस्था जगातील 100 सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. याची आठवण करून दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्थेचे कुलगुरु प्रा. विवेक सावजी यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले.

यावेळी 2017 मध्ये देश व विदेश स्तरावर झालेल्या स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये संस्थेला गौरवाचे स्थान मिळवून देणाऱया विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच गर्भवती व नवजात अर्भकाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर संशोधन करून पुरस्कार मिळविणाऱया डॉ. श्रीप्रसाद गौडर व त्यांच्या सहकाऱयांचाही सत्कार करण्यात आला. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित 27 भव्य आरोग्य शिबिरांमध्ये 1 लाख रुग्णांची तपासणी करून आरोग्य सेवा देणाऱया डॉ. आर. एस. मुधोळ यांचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

Related posts: