|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बालदिनी पंडित जवाहर नेहरुंना अभिवादन

बालदिनी पंडित जवाहर नेहरुंना अभिवादन 

वार्तार/ निपाणी

येथील व्हीएसएम मराठी व कन्नड कॉन्व्हेंट शाळा तसेच जी. आय. बागेवाडी हायस्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु जयंती अर्थात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, राणी चनम्मा, संगोळी रायण्णा, अक्कमहादेवी, ज्ञानेश्वर, शेतकरी, नरेंद्र मोदी आदी प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी प्राचार्य सिद्धू पाटील, पी. जे. नरके, सी. बी. कुरबेट्टी, डी. के. नाईक, डी. ए. रानमळे, संजय मोळवाडे, आर. ए. नाईक, के. जी. कमते यांच्यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

नूतन मराठी विद्यालय

येथील नूतन मराठी विद्यालयात बालदिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एम. बामणे होते. प्राचार्या एस. सी. धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बेडूक उडी, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी ए. एम. कुंभार, एस. पी. जगदाळे, एम. पी. खोत, एस. एस. पचंडी, एस. एस. कुलकर्णी, एस. के. जोशी, यु. एम. पाटील, यु. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ उपस्थित होते.

निबंध स्पर्धेत अस्मिता सावंत प्रथम

निपाणीत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतर्फे कुमार मंदीर येथे निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अस्तिमा सचिन सावंत या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक अनुष्का सुनील शेटके, तृतीय क्रमांक मंजिरी राजू बडवे यांनी पटकावला. तर चित्रकला स्पर्धेत देवरथ मोहन पाटील, ऋतुजा निवृत्ती चव्हाण, प्राची दीपक माने यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. विजेत्यांना शाखाधिकारी कदम यांच्या हस्ते मान्यवरांसह शिक्षकांच्या उपस्थितीत बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

संकेश्वर परिसर

संकेश्वर : संकेश्वर शहर व परिसरात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरणही करण्यात आले.

मलिकवाड येथे बालदिन साजरा

मलिकवाड : येथील मराठी व कन्नड प्राथमिक व माध्यमिक शाळेत पंडित नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मराठी प्राथमिक शाळेमध्ये बालदिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर कन्नड प्राथमिक शाळेत संगीत खुर्ची हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थिनी श्रद्धा शिंदे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.