|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सलग तिसऱया सत्रात भांडवली बाजारात घसरण

सलग तिसऱया सत्रात भांडवली बाजारात घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 181, एनएसईचा निफ्टी 69 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

नफा कमाई करत समभागांची विक्री करणे बुधवारीही कायम होते. सलग तिसऱया सत्रात भांडवली बाजार घसरत बंद झाला. निफ्टी घसरत 10,150 च्या खाली पोहोचला, तर सेन्सेक्स 250 अंशाने कमजोर झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 10,094 आणि सेन्सेक्स 32,683 पर्यंत घसरला होता.

बीएसईचा सेन्सेक्स 181 अंशाने घसरत 32,760 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 69 अंशाने कमजोर होत 10,118 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात जोरदार विक्री कायम आहे. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्का, निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.1 टक्के आणि बीएसइंचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

भांडवली बाजारातील सर्व क्षेत्रातील निर्देशांक कमजोर होत बंद झाले. धातू, औषध, एफएमसीजी, पीएसयू बँक, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू समभागात सर्वाधिक विक्री झाली. निफ्टीचा धातू निर्देशांक 3 टक्के, औषध निर्देशांक 2 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.2 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 1.1 टक्क्यांनी घसरला. बँक निफ्टी 0.25 टक्क्यांनी कमजोर होत 25,220 वर बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

बीपीसीएल, एशियन पेन्ट्स, अंबुजा सिमेंट, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, हीरो मोटो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस 2.4-0.25 टक्क्यांनी वधारले. भारती इन्फ्राटेल, वेदान्ता, सन फार्मा, हिंडाल्को, भेल, यूपीएल, ओएनजीसी, भारती एअरटेल, एनटीपीसी 4.9-1.7 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बायोकॉन, पेज इन्डस्ट्रीज, अमारा राजा बॅटरीज, ओबेरॉय रियल्टी, टाटा ग्लोबल 6.6-1.6 टक्क्यांनी वधारले. रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स पॉवर, नाल्को, अदानी एन्टरप्रायजेस 10.2-5.5 टक्क्यांनी कमजोर झाले.

स्मॉलकॅप समभागात श्रेयस शिपिंग, हनीवेल ऑटोमेशन, जेन टेक, वॉटरबेस, सोरिल इन्फ्रा 14-8.4 टक्क्यांनी मजबूत झाले. फेडर्स इलेक्ट्रिक, व्ही. बी. इन्डस्ट्रीज, हिंदुस्थान कॉपर, रिलायन्स नेव्हल, ऍक्शन कन्स्ट्रक्शन 12.5-8.1 टक्क्यांनी घसरले.

Related posts: