|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेझा गोवा कंपनी संदर्भात नाराजी

सेझा गोवा कंपनी संदर्भात नाराजी 

प्रतिनिधी/ कुडचडे

खाण वाहतूक दरावाढी मुळे किती तरी बैठका होऊन शेवटी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अखेरचा निर्णय होता की, सेझा खाण कंपनी व ट्रक मालकांनी हा विषय मिठवावा. पण, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर जरा सुद्धा विचार न करता कोडली येथे स्थायिक असलेल्या सेझा/वेदांन्त कंपनीने या निर्णयावर पाणी सोडले, त्यामुळे सेझा कंपनीच्या संदर्भात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

सोमवारी परत एकदा पोलिस बंदोबस्त मागवून ट्रक मालकांना धाक दाखवत सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंत पोलिसांना तैनात ठेऊन वाहतूक न करता शेवटी आपण वाहतूक करणार नाही असे लिखित पत्र सोमवारी धारबांदोडा उपजिल्हाधिकारी यांच्या हातात दिले. अशा या सेझा कंपनीच्या धोरणाने जनतेत कंपनी विरूध्द अधिक घृणा निर्माण होत आहे व मुख्यमंत्री सेझा कंपनीकडून मान्यता प्राप्त करू शकले नाही तर ट्रक मालक काय करू शकणार असे जनता आवर्जुन बोलत असल्याची माहिती सेझा गोवा ट्रक मालक संघटणेचे अध्यक्ष वल्लभ दळवी यांनी सावर्डे व्होडले घर येथे समिती सचिव गौरिश साळगांवकर, सदस्य महेश नाईक, राजेश पार्सेकर, किरण नाईक, प्रज्योत पार्सेकर, गौरिश नाईक, दिगांबर नाईक, उदय तारी यांच्या बरोबर माहिती देताना सांगितले.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, या नंतर जर सरकार वाहतूक दरवाढी बद्दल विचार करत असेल तर ट्रक मालकांना परवडेल असाच दर देण्याचा निर्णय घ्यावा व दरवाढी देताना जो दर देण्यात येईल तो एक ट्रक मालकांला कोणत्यापरीने परवडतो याची माहितीही जारी करावी अन्यथा जे खाण कंपन्यावर अवलंबीत आहे त्यांना दिवसाकाठी व मुलाबाळांना पोसण्या व शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठुन आणावा याचा मार्ग दाखवावा असे परिसरात जनता बोलण्यात येत आहे असे दळवी यांनी सांगितले.

सेझा कंपनीला जर ट्रक मालकांनी मागितलेली वाहतूक दर परवडत नसेल तर लाखो रुपये खर्च करून वाहतूक करण्याचा इराधा नसतानाही 200 हुन अधिक पोलिस कर्मचारी आणून आपल्या गेट वर ठेवायला व कोणताच व्यवसाय कार्यरत नसतानाही कंपनीच्या कामगारांना पगार देऊ शकते तर ट्रक मालक मागत असलेली वाहतूक दर कंपनी का देऊ इच्छित नाही ? असा प्रश्न दळवी यांनी जनेतेला विचारताना कंपनीला सांगण्यात आले की, कंपनी जर दरवाढीला मान्यता देत नसेल तर ट्रक मालक संघटना न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असे दर्शविले आहे.

Related posts: