|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुतळय़ाच्या साफसफाई प्रलंबित प्रकरणी शिवप्रेमी एकटवले

पुतळय़ाच्या साफसफाई प्रलंबित प्रकरणी शिवप्रेमी एकटवले 

प्रतिनिधी/ पणजी

वाळपई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा निषेध, प्रलंबित साफसफाई प्रकरणी वाळपई शिवप्रेमींच्या पाठीशी गोव्यातील समस्त शिवप्रेमी संघटना एकवटल्या आहेत.

येत्या 19 नोव्हेंबर रोजी शिवाजी महाराज गोव्यात येऊन 350 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त शिवरायांचा आदर्श समाजामसोर मांडणारे अनेक कार्यक्रमसुध्दा केले जाणार आहे.

याचेच औचित्य साधून राज्यातील शिवप्रेमींनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये वाळपई येथील छत्रपती शिवाजी चौकाची साफसफाई येत्या 19 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी, वाळपई येथील गेल्या शिवजयंतीचे बँनर फाडण्यात आले होते. यानंतर त्याच्या निषेधात केलेल्या प्रतिक्रीया प्रकरणानंतर शिवप्रेमींवर केलेले खटले त्वरीत मागे घ्यावे, व यंदा शासनाने गोमंतकातील किल्ले संरक्षण, संर्वधन योजना राबवावी व या 350व्या वर्षाचे महत्व ठिकठिकाणी शिवाजी महाराजाचे पुतळे उभारावे. यांचा समावेश आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत हिंदू जनजागृती समीतीचे प्रभारी जयेश थळी यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत वाळपई शिवप्रेमी संघटनेचे अध्यक्ष विश्वराज सावंत, भाई पंडित, माधव विर्डीकर, गौरीश सावंत, व शैलेंद्र वेलिंगकर उपस्थित होते.

हल्लीच नगरपालिका आणि उप जिल्हाधिकारी यांना वाळपई येथील शिवरायाच्या पुतळय़ाजवळी भागाची साफसफाई करण्यासाठी पत्र पाठविले असता. तिथल्या आजूबाजूची सफाई करण्यात आली. परंतू शिवराच्या पुतळय़ाजवळील वाढलेली चार तशीच ठेवण्यात आली. याबाबत नगरपालिकेला जाब विचारल्या असता तेथे कला 144 लागू करण्यात आल्यामुळे साफसफाई करण्यात आली नाही असे उत्तर मिळाले. हे अत्यंत दूर्देवी गोष्ट असून ज्या शिवरायांनी स्वराज्याचे एवढे मोठे काम केले असताना हा प्रकार त्यांचा व त्यांच्या कामाचा अपमान केल्या सारखे आहे. असे थळी यांनी अधिक माहीती देताना सांगितले.

तसेच याप्रकरणामूळे शिवप्रेमींची व देशप्रेमींची भावना दुखावली गेली आह. यामुळे प्रशासनाने या प्रकरणात जातीने लक्ष घालून शिवप्रेमींना न्याय मिळवून द्यावे असेही थळी यांनी सांगितले.

 

Related posts: