|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजी येथे 18 रोजी बालशिक्षण परिषद

पणजी येथे 18 रोजी बालशिक्षण परिषद 

प्रतिनिधी/ पणजी

 गोमंतक बाल शिक्षण संस्थेचे बालशिक्षण परिषद हे सहावे अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 रोजी डॉन बॉस्को ओरेटरी स्डेडीयम येथे होणार आहे, अशी माहिती या संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा दीक्षित यांनी दिली.

 संस्थेचे तिसवाडी तालुका समितीने हे अधिवेशन आयोजित केले आहे. दि. 18 रोजी सकाळी 10 वा. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. रविवार दि. 19 रोजी सायं. 4 वा. समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित असणार आहेत. ‘भावनिक बुद्धीमता’ हा या अधिवेशनाचा यंदाचा विषय आहे. या विषयावरील तज्ञ वक्ते डॉ. निलीमा गोखले व डॉ. विजया फडणीस या अनुक्रमे बालशिक्षणातील नवे प्रवाह व भावनिक बुद्धीमता या विषयावर प्रतिनिधींना संबोधन करतील. ‘सेतू’ या संस्थेच्या संचालक यांच्या नेतृत्वाखाली ‘भावनिक बुद्धीमता व सभावेशन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात सेलीना पो, मधुरा मणेरीकर, प्रीती आस्थाना या सहभाग दर्शविणार आहेत. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश पानसे या अधिवेशनात निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे, असे यावेळी तिसवाडी तालुका समितीचे कार्याध्यक्ष प्रेमानंद महांबरे यांनी सांगितले.

 अधिवेशनाच्या आयोजनासाठी मयेचे आमदार प्रविण झांटय़े यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निवडण्यात आली आहे. यात वैदही नाईक या उपाध्यक्ष, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळेकर स्वागताध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष म्हणून प्रेमानंद महांबरे, सचीव नारायण कामत, खजिनदार संतोष गांवकर यांची निवड करण्यात आली आहे.

 हे अधिवेशन गोवा सरकारच्या शिक्षण खात्याच्या सहकार्याने होत आहे. गोवा सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने अंगणवाडी शिक्षिकांना या अधिवेशनात भाग घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या अधिवेशनात भाग घेणाऱया शिक्षकांना शनिवारी ऑन डय़ूटी असे समजण्यात येईल असे शिक्षण खात्याने परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. या अधिवेशनात शैक्षणिक साधने, खेळणी व पुस्तकांचे प्रदर्शन भरणार आहे, असे यावेळी प्रेमानंद महांबरे यांनी सांगितले.

  2007 साली बालशिक्षण या संस्थेची स्थापना करण्यात आली. गेली अनेक वर्षे हे वेगवेगळय़ा ठिकाणी घेतले जाते. या वर्षी पणजीत हे अधिवेशन होणार आहे. व्याख्याने परिसंवाद, चर्चासत्रे, पालकसंवाद प्रबोधन, पुस्तकावर चर्चा समुदेशन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दोन दिवस असे कार्यक्रम होणार आहेत, असे यावेळी सुरेखा दीक्षित यांनी सांगितले.

Related posts: