|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी कलाकृतींची उभारणी

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी कलाकृतींची उभारणी 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध असून त्यासाठी त्यांना आकर्षीत करण्यासाठी सरकातर्फे अनेक प्रयत्न केले जातात. पणजी शहराच्या सौंदर्यीकरण्यासाठी पणजी ते मिरामार पर्यंत ठीक ठीकाणी विविध प्रकारच्या कलाकृती ठेवल्या आहेत. पहिल्या दोन आठवढय़ात देशी तसेच विदेशी पर्यटकांचे लक्ष केंद्रीत करण्यात या कलाकृती यशस्वी ठरल्या. राज्यात येणाऱया देशी तसेच विदेशी पर्यटक या आकृतीकडे येऊन स्वताचे फोटो काढताना दिसत होते. नंतर काही दिवसांनी याकडे सर्वांनी दुर्लक्षीत केल्याचे दिसून आले आहे. स्वच्छ भारत बनविण्याच्या दिशेंने चालत असलेल्या राज्यात पर्यटकासाठी आकर्षीत करण्यासाठी ठेवलेल्या कलाकृतीच्या बाजुला कचरा च कचरा गोळा झालेला दिसत आहे. 

सरकारतर्फे स्वच्छ भारत बनविण्यासाठी अनेक खर्च केला जातो तरी सुद्धा राज्यात महत्वाच्या ठिकाणी कचराच गोळा झालेला दिसतो. ज्या ठिकणी सरकारने स्वच्छ ठेवायला हवे त्याच ठीकाणी सरकार अपयशी ठरलेला दिसतो. जरी या कला आकृती शहराच्या सौंदर्यीकरण्यासाठी होत्या तर त्याची साफ-सफाईच्या कामाकडे सुद्धा लक्ष घालायला हवं होतं. अशा अस्वच्छतेमुळे देशी तसेच विदेशी पर्यटक अशा कला आकृतीकडून दूर जात असल्याचे दिसत आहे. सरकातर्फे कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ भारत अभियनातर्फे अनेक कर्मचारी नेमले असतानाही शहरात अशा प्रकारची दुर्गंधी असणे म्हणजे फार वाईट गोष्ट आहे.

या कला आकृतीकडे प्लास्टीकच्या पिशव्या तसेच दारूच्या बाटल्या आणून टाकलेल्या दिसतात. याकडे सरकारने त्वरीत लक्ष घालून शहराचे सौंदर्यीकरण करताना स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष ठेवावे.

Related posts: