|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजीव यदुवंशी यांची सहा तास चौकशी

राजीव यदुवंशी यांची सहा तास चौकशी 

खाण घोटाळा प्रकरण, चौकशी आजही चालू राहणार

प्रतिनिधी/ पणजी

स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम (एस.आय.टी) च्या अधिकाऱयांनी माजी खाण सचिव राजीव यदुवंशी यांची दुसऱयांदा उलटतपासणी केली. 16 खाणींचे लीज नूतनीकरण करताना झालेल्या घोटाळय़ावर सहा तास चौकशी केली. परंतु ती अपूरी राहिल्याने आज गुरुवारी त्यांना परत बोलावण्यात आले आहे.

 दरम्यान प्रमुख संशयित आरोपी असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खाण मालक प्रफुल्ल हेदे व खाण खात्यातील जिओलॉजिस्ट शोभना रिवणकर यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे

गोव्यातील खाणीना पोर्तुगीज सरकारने लीज दिल्या होत्या. गोवा सरकारने त्याचे दोन वेळा नूतनीकरण केले. 2007 मध्ये लीजची मुदत संपणार होती. लीज संपण्यापूर्वी ज्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला त्यांची लीज चालू ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला.

एकूण 40 खाण मालकांनी लीज मुदत संपल्यानंतर नूतनीकणासाठी अर्ज केला होता. या काळात दिगंबर कामत मुख्यमंत्री होते. उज्शराने अर्ज केल्यामुळे लीज चे नूतनीकरण होण कठीण होते, तरी पण अर्ज करण्यास झालेला उशीर गोवा सरकारने माफ केला. माफ केलेल्या 40 पैकी 16 प्रकरणात कधी लीज नूतनीकरण झाले याची आपल्याला कोणतीच कल्पना नसल्याची भूमिका यदुवंशी यांनी घेतली आहे.

दिंगबर कामत यांना समन्स

यदुवंशी आपल्या जबानीत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे नाव घेतात. त्यांच्या दबावामुळे लीज नूतनीकरण झाले, असे बोलले जाते. नेमका कोणता प्रकार झाला होता हे जाणून घेण्यासाठी आता या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दिगंबर कामत यांना पोलिसांनी समन्स जारी करून उलटतपासणीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  खाण मालक प्रफूल्ल हेदे, खाण खात्यातील अधिकारी शोभना रिवणकर यांनाही साक्ष देण्यास बोलावण्यात आले आहे.

 

Related posts: