|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेल्वे स्थानकासमोर फडकतोय लाल-पिवळा

रेल्वे स्थानकासमोर फडकतोय लाल-पिवळा 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस लाल-पिवळा ध्वज फडकाविण्यात आला आहे. केंद सरकारी मालमत्तेच्या कक्षेत अशाप्रकारे बेकायदेशीर ध्वज फडकाविण्याची कामगिरी करणाऱया संघटनांच्या दबावामुळे रेल्वे पोलीस मौन पाळून आहेत. तसेच या ध्वजाला संरक्षण पुरविण्याची व्यवस्था रेल्वे पोलिसांनी केली आहे.

रेल्वे स्थानकासमोर काही संघटनांनी लाल-पिवळा ध्वज लावण्याची कामगिरी केली आहे. सदर ध्वजाच्या संरक्षणासाठी रेल्वे पोलिसांनी आपला फौजफाटा सज्ज ठेवला आहे. एकीकडे कर्नाटकी अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेला जुंपण्यात आले आहे तर रेल्वे पोलीस स्थानकाकडे ध्वज संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस यंत्रणेने सदर ध्वज हा काही संघटनांच्या दबावाखाली फडकाविल्याचे बोलले जात आहे. सदर ध्वजाच्या संरक्षणाची जबाबदारी वाहणारी पोलीस यंत्रणाही आता याच कामात गुंतली आहे.

मराठी युवा मंचने विचारला जाब

या प्रकारासंदर्भात मराठी युवा मंचच्या काही कार्यकर्त्यांनी रेल्वे पोलीस स्थानकात जाऊन याबद्दल जाब विचारला. परंतु, याला समर्पक उत्तरे देण्याऐवजी अधिकाऱयांनी उद्धट उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली. तसेच आम्ही हा ध्वज काढला तर आम्हाला काही संघटनांचा रोष पत्करावा लागेल, अशी धास्ती व्यक्त केली.

Related posts: