|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » ‘दशक्रिया’ चित्रपट न दाखवण्याचा कोथरूड सिटी प्राईडचा निर्णय

‘दशक्रिया’ चित्रपट न दाखवण्याचा कोथरूड सिटी प्राईडचा निर्णय 

ऑनलाइन टीम / पुणे  :

पद्मावती चित्रपटाला होणाऱया विरोधाचा वाद देशभर गाजत असतानाच आता ‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे.या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील कोथरूड सिटी प्राईड हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱयांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना मंगळवारी भेटून दिले.

चित्रपटाच्या टेलरमध्ये ‘ब्राह्मण लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी दशक्रिया विधी करतात,’ अशी खोचक टिप्पणी करीत ब्राम्हणांसह हिंदू धर्मालाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा आहे. ज्ये÷ लेखक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून, संदीप पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. परंतु आता कोथरूड सिटी प्राईडने हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱयात अडकल्याचे पहायला मिळाले आहे.

 

Related posts: