|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे 

पुणे / प्रतिनिधी :

बुधवार पेठ येथील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी भिडे वाडा स्मारक समितीच्या वतीने मानवी साखळी करीत गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

माजी आमदार कमलताई ढोले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दीपक जगताप, चांगदेव पिंगळे, मधुकर जगताप, मंजिरी धाडगे, सतीश गायकवाड, ऋतिक गवळी यांच्यासह अन्य यात सहभागी झाले. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झालाच पाहिजे, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

या वेळी बोलताना ढोले-पाटील म्हणाल्या, भारतात महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठ येथील भिडे वाडय़ात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कालांतराने ही शाळा बंद पडली. पंरतु, ज्या वाडय़ात फुले दाम्पत्याने दूरदृष्टी ठेऊन महिलांच्या शिक्षणाची मशाल पेटवली, ती वास्तू आज जीर्ण अवस्थेत आहे. याचे प्रत्येक भगिनीला, समाजबांधवांना दुःख आहे. ही वास्तू खरेतर प्रेरणेचे केंद्र व्हायला पाहिजे. त्यामुळेच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नात लक्ष घालण्यासंदर्भात भिडे वाडा स्मारक समितीच्या वतीने त्यांना निवेदनही देण्यात आले.

Related posts: