|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » लहुजींवर राज्य सरकार चित्रपट काढणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

लहुजींवर राज्य सरकार चित्रपट काढणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

पुणे/ प्रतिनिधी :

आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी तरुणांना दिशा देण्याचे काम केले असून, त्यांचे जीवनचरित्र पुढे आणण्यासाठी राज्य सरकार यांच्यावर चित्रपट काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिली.

पुण्यातील संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्मारक स्थळास फडणवीस यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यांनी तरुण वर्गाला आणि प्रत्येक समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे देशात क्रांती घडली, हे विसरता कामा नये. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांचे उत्तम दर्जाचे स्मारक या पुढील काळात उभारले जाणार असून, सरकारकडून मोठय़ा प्रमाणावर निधी दिला जाणार आहे. लवकरात लवकर हे स्मारक कसे उभारले जाईल, यासाठी विशेष प्रयत्न असेल.

Related posts: