|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » खादीचे ब्रँडिंग हवे : मुख्यमंत्री

खादीचे ब्रँडिंग हवे : मुख्यमंत्री 

पुणे / प्रतिनिधी :

खादी आपल्या देशातील मोठी संपत्ती असून, त्याचे योग्य ब्रँडींग केले, तर ती जगभरात जाईल आणि तिची किंमत व पतदेखील वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

महाखादी विक्री केंद्र आणि महाखादी ग्रामीण कारागिर संग्रहालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री दिलिप कांबळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाखादी बँडची आपण निर्मिती करून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. गांधीजींनीदेखील आपल्याला हाच मंत्र दिला आहे. आपल्याकडील बारा बलुतेदारांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे कला, गुण जोपासून त्याला वाव दिला पाहिजे. आपल्याकडील घोंगडी छान गरम आहे. पण ती मऊ नसल्याने त्याची किंमत कमी होते. सध्या ऑस्ट्रेलियासोबत बोलणी सुरू असून आपल्याकडील घोंगडी मऊ कशी करता येईल, यावर प्रयोग सुरू आहेत. तो यशस्वी झाल्यास आपल्या घोंगडीला जगात भरपूर मागणी निर्माण होईल. खादीच्या माध्यमातून आपण आपली पत दाखवून दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा आणि राज्यसभेवरील महाराष्ट्राच्या खासदारांना मी एक पत्र पाठविणार असून, यात राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या भागात एक खादी स्टोअर उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सुचविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: