|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » …तर दीपिकाचे नाक कापू !

…तर दीपिकाचे नाक कापू ! 

लखनौ / वृत्तसंस्था :

पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर त्यातील अभिनेत्री दीपिका पदूकोनचे नाक कापले जाईल अशी धमकी करणी सेनेने गुरुवारी दिली. तर पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध पाहता उत्तरप्रदेशच्या गृह मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले. राज्यात स्थानिक स्वराज संस्था निवडणूक होत असल्याने चित्रपट प्रदर्शित केल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतो असे यात नमूद करण्यात आले. तर मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे कार्यालय आणि घराला सुरक्षा पुरविली.

राजपूत कधीच महिलांवर हात उचलत नाहीत, परंतु गरज भासली तर लक्ष्मणाने शूर्पणखेची जी स्थिती केली होती, तीच दीपिका पदूकोनची करू अशी धमकी करणी सेनेचे महिलपाल मकराना यांनी दिली. या वक्तव्याबद्दल करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंग कालवी यांना विचारणा झाली असता त्यांनीही याला समर्थन दिले. जर   अनुयायांना असे म्हणावे लागत असेल तर त्याला तसेच कारण असेल असा दावा त्यांनी केला.

1 डिसेंबर रोजी भारतबंद

याचदरम्यान करणी सेनेने चित्रपटाच्या विरोधात 1 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. आम्ही लाखोंच्या संख्येत जमू. आमच्या पूर्वजांनी रक्ताने इतिहास लिहिला, आम्ही या इतिहासावर काळे फासण्याची अनुमती कोणालाच देणार नाही असे कालवी म्हणाले.

चित्रपटाला दाऊदचा पैसा

भन्साळी 200 कोटी रुपयांमध्ये चित्रपट तयार झाल्याचे सांगतात, नोटाबंदीच्या 14 दिवस अगोदर त्याचे चित्रिकरण सुरू झाले. 99 टक्के चित्रिकरण नोटाबंदीच्या काळात झाले. मग त्यासाठी पैसा आला कोठून? चित्रपटासाठी दुबईतून रक्कम येत आहे. दाऊद इब्राहिमचा हा पैसा असल्याचा आरोप कालवी यांनी लखनौमध्ये बोलताना केला.

हिंदूंच्या विरोधात चित्रपट

अलाउद्दीनची मुलगी फिरोजा ही जालौरचे महाराज बीरमदेव यांच्या प्रेमात पडली हा इतिहास आहे. अल्लाउद्दीनने बीरमदेव यांना विवाह करण्याचा प्रस्ताव दिला, परंतु त्यांनी तो नाकारला. शिर कापून घेईन, परंतु तुर्क महिलेशी विवाह करणार नाही असे बीरमदेव यांनी म्हटले होते. त्यांनी शिर कापून घेतले आणि फिरोजा यमुनेमध्ये सती गेली. ही कथा नाही का? परंतु या कथेत प्रेमिका मुस्लीम तर समोरील हिंदू असल्यानेच यावर चित्रपट तयार केला जाणार नाही असे वक्तव्य कालवी यांनी केले.

Related posts: