|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » पंढरपूरात ऊसदर आंदोलानाला हिंसक वळण;एसटीची तोडफोड

पंढरपूरात ऊसदर आंदोलानाला हिंसक वळण;एसटीची तोडफोड 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

अहमदनगरपाठोपाठ आता सोलापूर जिह्यात ऊसदाराचे आंदोलन चिघळले आहे. पंढपुरात ठिकठिकाणी आंदोलकांचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरटी इथे आंदोलकांनी एसटी बस फोडली तर आज पहाटे कराड-उस्मानाबाद बसमधून प्रवाशांना उतरवून आंदोलकांनी एसटीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

गुरूवारी संध्याकाळी अनवली इथे जत डेपोची एक बस आणि एका ट्रकची तोडफोड करण्यात आली. ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी दुपारी सोलापूर इथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. यात तोडगा न निघाल्यास मात्र अहमदनगरप्रमाणे हे आंदोलनही पेटण्याची शक्यता आहे.ऊसला 3100 रूपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

 

Related posts: