|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार वाहनांचा अपघात,पाच जखमी 

ऑनलाइन टीम / कर्जत :

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी तीघांची प्रकती गंभीर असून त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱया मार्गावर हा विचित्र अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणारी भरधाव कार खोपोलीजवळ उलटली. त्यामुळे मागून येणारी कार, टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक झाली यात पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहे.

 

 

 

 

Related posts: