|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » डीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा ; 23 नोव्हेंबरपर्यंत जामिनाची मुदत वाढ

डीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा ; 23 नोव्हेंबरपर्यंत जामिनाची मुदत वाढ 

ऑनलाइन टीम / पुणे :

डीएसके कंपनीचे मालक डि . एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना हायकोर्टाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. 23 नोव्हेंबर पर्यंत डिसकेंना अंतरिम जामीनाची मुदत वाढ करून मोठी रक्कम जमा करण्यास सांगितले आहे.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयने डिएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर हायकोर्टाने डिएसकेंना आठवडय़ाच्या आत सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाहीतर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी उभे राहण्यासाठी सांगितले. त्यामुळे डीएसकेंना तात्पुरता दिलासा मिळाला होता. आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने डिएसकेंना 23 नोव्हेंबरपर्यंत जामीनाची मुदत वाढ करून मोठी रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम नेमकी किती आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

Related posts: