|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » ‘दशक्रिया’वरील बंदीची याचिका फेटाळली

‘दशक्रिया’वरील बंदीची याचिका फेटाळली 

औरंगाबाद / प्रतिनिधी :

‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी फेटाळली. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

पैठण येथील पुरोहित समीर शुक्ला, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी, संतोष छडीदार व गोवर्धन छडीदार यांनी ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानीकारक, भावना दुखावणारे व संदर्भहीन असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील श्रीकांत अदवंत यांनी केला होता. घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार आहेत. गरुडपुराण, निर्णयसंहिता, धर्मसिंधू, अंत्येष्टी संस्कार आदी ग्रंथांमध्ये याबाबत लिहिलेले आहे. हे थोतांड नसून, हिंदू संस्कृती आणि परंपरेने चालत आलेला महत्त्वाचा विधी आहे. हे एका वर्गाचे उपजीविकेचे साधन असून, यामध्ये आक्षेप घेण्यासारखेही काही नाही, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. त्यामुळे चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद, दृश्ये वगळण्यात यावी आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, याबाबतची याचिका खंडपीठाकडून फेटाळण्यात आली.

 

Related posts: