|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » कंपन्यांचे निकाल उघड करण्यांचा सेबीकडून तपास

कंपन्यांचे निकाल उघड करण्यांचा सेबीकडून तपास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खासगी कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर करण्यापूर्वीच ते सोशल मीडिया चॅटरूममध्ये पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सेबीकडून तपास करण्यात येईल असे बाजार नियामकाचे प्रमुख अजय त्यागी यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांसाठी असणाऱया व्हॉट्सअप समुहामध्ये काही प्रमुख कंपन्यांचे निकाल जाहीर करण्यापूर्वीच उघडकीस आले होते. 2015 पासून अशा प्रकारच्या समुहामध्ये काही कंपन्यांचे निकाल उघड करण्यात  येत आहेत, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या कंपन्यांचा निकाल अगोदरच गुंतवणूकदारांना मिळत असल्याने त्यानुसार ते गुंतवणूक करत होते. यामुळे त्याचा बाजारातील व्यवहारांवर परिणाम होत आहे. गोपनीय माहिती उघड करण्यात येत असल्याचे सेबीला समजल्यानंतर ऑगस्टमध्ये माजी सनदी अधिकारी टी. के. विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. भांडवली बाजारातील गोपनीयतेचे पालन करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी समितीकडून उपाययोजना सुचविण्यात येतील.

बल्क मॅसेजेस, ई मेल, ब्लॉक, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावरून ट्रेडिंग टिप्स आणि समभाग निवडीसंदर्भात माहिती जाहीर करण्यास गेल्या वर्षी सेबीकडून बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती प्रसिद्ध करण्यासाठी गुंतवणूक सल्लागार अशी नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होत असल्याचे सेबीचे म्हणणे आहे.

Related posts: